“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 हातात घेत Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी

53
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 हातात घेत Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 हातात घेत Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी

पुण्याच्या (Pune) चाकणमध्ये (Chakan) आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडलं. दोन्ही दिग्गज नेत्यांनी AK-47 चा अनुभव घेतला. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांना उद्देशून मिश्किल वक्तव्य केलं आहे. महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर गोळ्या घालू, असं अजित पवार (Ajit Pawar) मिश्किलपणे म्हणाले आहेत.

हेही वाचा-Maharashtra औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

दोन्ही नेत्यांनी एके 47 हातात घेत, अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने वेध घेतला. “महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू”, अशी मिश्किल टिप्पणी करत अजित दादांनी (Ajit Pawar) मीडियावर निशाणा साधला.

हेही वाचा-Dress Code : पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

“आम्ही दोघं तर सर्वांना उडवून टाकू. महायुतीच्या नीट बातम्या द्या. नाहीतर बघा”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आणि एकच हशा पिकला. यानंतर अजित पवारांनी AK-47 रायफल ठेवून दिली. ही रायफल ठेवत असताना एवढंच छापतील, असंही अजित पवार हसत-हसत म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चांगलेच हसताना बघायला मिळाले. तर दोन्ही नेत्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील व्हिडीओत दिसत आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.