महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून २१ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. तर, शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे (NCP) 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. (Ajit Pawar)
हेही वाचा-Bangladesh मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक !
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले. आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले आहेत. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. त्यानंतर, 2 महिन्यातच महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली. आम्ही आता ठरवले आहे, आता 5 वर्षात मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचे देखील त्यावर एकमत झाले आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे.” अशी माहिती अजित पवारांनी दिली. (Ajit Pawar)
हेही पहा-