Ajit Pawar : अजित पवारांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले मनोगत; म्हणाले…

156
Ajit Pawar : अजित पवारांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले मनोगत; म्हणाले...

राष्ट्रवादी पक्षेत बंड करून सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज म्हणजेच मंगळवार १० ऑक्टोबर रोजी १०० दिवस पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जनतेशी एका पत्रामधून संवाद साधला आहे. “महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय राज्यातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आधारित होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्रातून जाहीरपणे म्हंटले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पत्रात शरद पवारांचा उल्लेख न करता म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पूर्वी मोठ्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेऊन निर्णय घेतले आहेत. सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती राजकीय नेत्यांना असे निर्णय घेण्यास भाग पाडते. माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने २ जुलै २०२३ रोजी सरकारमध्ये सामील होण्याचा असाच निर्णय घेतला होता.”

ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे ‘सत्तेच्या माध्यमातून बहुजनांना पाठिंबा देणे आणि जनतेला उत्तर देणे’ हे बोधवाक्य होते, त्याप्रमाणे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये ‘बहुजनांचा विकास आणि विचारधारा’ या तत्त्वावर काम करेल, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – Mumbai Congress : काँग्रेसच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांनी दाखवली जागा)

विशेष म्हणजे या पत्रात त्यांचे वर्णन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असेही करण्यात आले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीला त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाज सुधारकांच्या विचारांच्या मार्गावर चालत राहील. राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ते आणि त्यांचे सहकारी लोक कल्याणासाठी काम करत राहतील आणि त्यांच्याशी संबंधित समस्या सोडवतील. महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिला आणि विविध सामाजिक गटांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्रियपणे काम करत आहे हे नजीकच्या भविष्यात माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे कार्य सिद्ध करेल, असेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.