‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?

39
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध? Devendra Fadnavis काय म्हणाले?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने आपले स्टार प्रचारक उतरवले होते. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचाही समावेश होता. प्रचारावेळी योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा लगावला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोध केला होता. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे.

“”लाडकी बहीण योजनेला आम्ही अर्थसंकल्पातून मदत देणार”
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “लाडकी बहीण योजनेला आम्ही अर्थसंकल्पातून मदत देणार आहोत. पण मविआ तर या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत असे म्हणत होती. मात्र त्यांनी स्वत:हून अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनाच नव्हे तर सर्वच पक्षांना आम्ही उमेदवार दिले आहेत. उद्धवसेनेच्या पहिल्या यादीत आमच्या १७ उमेदवारांचा समावेश होता. कारण त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती.”

“जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही”
बटेंगे तो कटेंगे वर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “‘बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही. देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. त्यामुळं ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की एक है तो सेफ है.” असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.