मंत्री Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे मौन; राजकीय चर्चांना उधाण

84
मंत्री Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे मौन; राजकीय चर्चांना उधाण
  • प्रतिनिधी

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न अनुत्तरितच आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, त्यांनी हा प्रश्न झटकत “हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा” असा सल्ला दिला. त्यांच्या या उत्तरामुळे महायुतीतून मुंडेंना (Dhananjay Munde) संरक्षण मिळत आहे का? यावर चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा – प्रवासाला निघण्यापूर्वी आता FASTag बॅलन्स नक्की तपासा; लागू झाले आहेत नवे नियम)

अजित पवार जबाबदारी झटकत आहेत?

इतके गंभीर प्रकरण समोर असतानाही पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, मग धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अपवाद का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : दुबईत गंभीर आणि आगरकर यांच्यात मैदानातच रंगला वाद?)

धनंजय मुंडेंना कोणाचा वरदहस्त?
  • धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव प्रकरणात आल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे.
  • तरीही त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
  • पक्षातील वरिष्ठ नेतेही यावर खुली भूमिका घेत नसल्याने मुंडेंचे (Dhananjay Munde) राजकीय वजन वाढले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

(हेही वाचा – Earthquke in Bihar-Odisha : दिल्लीपाठोपाठ बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)

राजकीय पक्षश्रेष्ठी गप्प का?

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकरणावर अजित पवार काहीही बोलण्यास तयार नाहीत. हे त्यांच्या धनंजय मुंडेंवरील विश्वासाचे लक्षण आहे की राजकीय कोंडी? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु या मुद्यावर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.