मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Bus) भाडेवाढीच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळातच विसंवाद उफाळून आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी एस.टी. भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर वेगळीच भूमिका मांडली आहे. भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar)
अजित पवार यांनी म्हटले की, “एस.टी. महामंडळाने प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या, तेव्हाच भाडेवाढ (ST Bus fare hike) योग्य ठरेल. सध्या प्रवाशांना चांगल्या सेवा मिळाल्याचा अनुभव येत नाही. त्यामुळे भाडेवाढीचा निर्णय घेतला जाणार नाही. महामंडळाच्या (ST Bus Corporation) आर्थिक स्थितीला चालना देण्यासाठी इतर पातळ्यांवर काम सुरू आहे.”
(हेही वाचा – Utsav Chowk : उत्सव चौक का आहे प्रसिद्ध?)
सरनाईक-पवार मतभेद उघड
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिझेल, सीएनजीच्या वाढत्या किमती आणि एस.टी. महामंडळाच्या वाढत्या खर्चाचा संदर्भ देत भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. मात्र, अजित पवार यांनी या भाडेवाढीची शक्यता फेटाळून लावत म्हटले की, “सरकार प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय भाडेवाढीचा विचार करणार नाही.”
एस.टी.च्या आर्थिक सुधारणा हवीत
एस.टी. महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. वाढत्या इंधन दरांमुळे आणि देखभालीच्या खर्चामुळे महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढीऐवजी दर्जेदार सेवा देणे, हीच प्रवाशांच्या आणि महामंडळाच्या हिताची बाब असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
(हेही वाचा – Kho-Kho World Cup : खो-खो खेळाला ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा क्रीडामंत्र्यांचा निर्धार)
महत्त्वाचे निर्णय लवकरच
अजित पवार यांनी एस.टी. महामंडळाच्या सुधारणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, एस.टी. भाडेवाढीसाठी प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. एस.टी.च्या दरवाढीवरून सुरू असलेल्या वादळाचे पुढे काय होईल आणि सरकार कोणते निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community