Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची? अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेला उधाण

160
Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची? अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेला उधाण

राज्यात आज म्हणजेच सोमवार २५ सप्टेंबर रोजी एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) पक्षातही उभी फूट पडली. तेव्हापासून खरी राष्ट्रवादी कोणाची आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कोण शरद पवार की अजित पवार यावरून सतत वाद सुरु आहेत. त्यामुळे आता खरी राष्ट्रवादी कोणाची? हा प्रश्न आता कायद्याने म्हणजेच निवडणूक आयोगाच्या मदतीने सोडवला जाणार आहे. दरम्यान अजित पवार यांनी आपल्याला निवडणूक आयोगाचा प्रत्येक निर्णय मान्य असल्याचे सांगितले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

(हेही वाचा – R Ashwin : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम)

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला तरी मान्य असेल असं (Ajit Pawar) अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले. अजित पवार पुढे म्हणाले की; “यामध्ये काही तथ्य नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. जोपर्यंत कुठला निकाल येत नाही तोपर्यंत हे असं झालं तर तसं झालं तर काय होईल हे असले मी विचार पण करत नाही. मी फक्त विकासाचा विचार करतो. इलेक्शन कमिशन (Election Commission) अंतिम निर्णय देते, इलेक्शन कमिशनसमोर दोन्ही गट आपली बाजू मांडतील. बाजू मांडल्यानंतर जो अंतिम निर्णय येईल तो मी तरी मान्य करणार आहे.”

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी २३ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. मात्र नेमके तेव्हाच (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत होते. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता, “अमित शहांच्या कार्यालयाला मी तसं कळवलं होतं,” अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.