राजस्थानच्या अजमेरमध्ये 90च्या दशकात 100 हून अधिक मुलींवर बलात्कार झाला होता. त्या घटनेवर ‘अजमेर 92’ नावाचा चित्रपट येत आहे. द काश्मीर फाइल्स, द केरळ स्टोरी या चित्रपटांना जसा विरोध झाला त्याच पद्धतीने इस्लामिक संघटना याही चित्रपटाला विरोध करत आहेत. अजमेर शरीफ दर्गा आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा हवाला देऊन ‘अजमेर 92’ चा विरोध केला जात आहे. लाखो हृदयांवर राज्य करणारा शांतता दूत म्हणून ख्वाजाचे वर्णन आहे. मात्र या चित्रपटामुळे अजमेर शरीफ दर्ग्याची बदनामी केल्याचा आरोप केला जात आहे. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप होत आहे.
चित्रपट निर्माते काल्पनिक घटनेवर चित्रपट बनवत आहेत का? तर नाही! देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलवर हा चित्रपट बनवला जात आहे. जर त्यातील आरोपींचे संबंध अजमेर दर्ग्याच्या खादिमांशी जोडले गेलेले तर त्यात चित्रपट निर्माते कसे दोषी असतील. जर तुम्ही अजमेर सेक्स स्कँडलशी संबंधित बातम्या वाचल्या तर तुम्हाला बहुतेक ठिकाणी तीन आरोपींची नावे दिसतील – फारुख चिश्ती, नफीस चिश्ती आणि अन्वर चिश्ती. हे तिघेही दर्ग्यातील खादिम होते. जरी चित्रपट निर्मात्याने निष्पक्ष होऊन चित्रपट बनवण्याचे ठरवले तरी या प्रकरणातील आरोपी खादिम होते हे सत्य नाकारता येणार आहे का?
(हेही वाचा Muslim : धर्मांध मुसलमान चक्क गोमांस घालून समोसे विकायचा)
एमए खान यांच्या पुस्तकात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा काय उल्लेख आहे?
अजमेर दर्गाशिवाय मुस्लिम संघटनांमध्ये सर्वात मोठी भीती अशी आहे की, गरीब नवाज म्हणून ओळखले जाणारे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचाही यामुळे अपमान होऊ शकतो. स्वत:च्या बळावर या चित्रपटावर बंदी आणावी किंवा पडद्यावर आणू नये, अशी त्यांची इच्छा आहे. जमियतच्या मदनी यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना महान शांतता दूत म्हटले आहे. मात्र, इतिहासकार एम.ए.खान यांच्या ‘इस्लामिक जिहाद: अ फोर्स्ड कन्व्हर्जन, इम्पेरिअलिझम अँड ए लेगसी ऑफ स्लेव्हरी’ या पुस्तकात प्रसिद्ध सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल वेगळेच लिहिले आहे.
मोईनुद्दीन चिश्ती, निजामुद्दीन औलिया, नसिरुद्दीन चिराग आणि शाह जलाल यांसारख्या सुफी संतांचा उल्लेख करून या पुस्तकात म्हटले आहे की, हिंदूंच्या दडपशाहीला विरोध करणे तर दूरच, या सूफी संतांनी हिंदूंचा जबरदस्तीने छळ केला. इस्लाम धर्मांतरातही त्यांची मोठी भूमिका होती. एवढेच नाही तर ‘सूफी संत’ मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शिष्यांनी हिंदू राण्यांचे अपहरण करून मोईनुद्दीन चिश्ती यांना भेट म्हणून दिले. तसेच सूफींचे अनुयायी हिंदूंच्या पवित्र स्थळी गायींची कत्तल करून खात असल्याची चर्चाही जुन्या लिखाणात वाचायला मिळते.
Join Our WhatsApp Community