ईडीच्या छापेमारीत सापडल्या दोन AK-47 रायफल्स, झारखंडमध्ये खळबळ

94

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी बिहार विधानसभेत बहुमत चाचणी होण्यापूर्वीच ईडीकडून बिहारमध्ये धाडसत्र सुरू करण्यात आले होते. तसेच बिहारचे संलग्न राज्य असलेल्या झारखंडमध्ये देखील ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ed निकटवर्तीयांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली, यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या छापेमारीदरम्यान दोन AK-47 रायफल्स मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचाः ‘मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग’, शिंदे गटाची टीका)

ईडीच्या तपासणीत सापडल्या AK-47

बेकायदा उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने 18 ते 20 ठिकाणी छापेमारी केली होती. झारखंडचे आमदार पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांच्या चौकशीनंतर ईडीकडून हा कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या छापेमारीदरम्यान प्रे प्रकाश यांच्या घरात दोन AK-47 रायफल्स सापडल्या आहेत. रांची येथील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकल्यानंतर कपाटात या रायफल्स सापडल्या असून सीआरपीएफने त्या जप्त केल्या आहेत.

कोण आहेत प्रेम प्रकाश?

प्रेम प्रकाश हे झारखंडच्या राजकारणातील एक मोठी असामी असल्याचे म्हटले जाते. झारखंडमधील नोकरशहा आणि राजकीय पक्षांमध्ये प्रेम प्रकाश यांची मजबूत पकड आहे. ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.