अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून कसबा पेठ मतदारसंघातून ब्राम्हण उमेदवार द्यावा, अशी मागणी भाजपाकडे करण्यात आली आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे या मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. (Akhil Bharthiya Brahman Mahasangh)
( हेही वाचा : Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळांना मुबलक निधी)
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक सल आहे की, कसबा आपण हरलो. त्यामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपा (BJP) आणि महायुतीच्या ताब्यात यावा, असे आम्हाला वाटते. भारतीय जनता पार्टीचा गड असलेला हा मतदारसंघ गिरीश बापट, मुक्ता टिळक यांसारख्या मातब्बर नेते मंडळींनी राखला. तो पुन्हा एकदा भाजपच्या (BJP)ताब्यात यावा, अशी सामान्य कार्यकर्त्यांची आणि भाजपवर प्रेम करणाऱ्या मतदारांची इच्छा आहे. मात्र शेवटी पक्ष नेतृत्त्व याविषयी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिली. (Akhil Bharthiya Brahman Mahasangh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community