समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आधीच तूतू मैमै सुरू असतांनाच सपाने आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना देशाचे भावी पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. लखनौमधील समाजवादी पक्षाच्या कार्यालयात अखिलेश यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहे. मजेची बाब अशी की, अखिलेश यादव यांचा वाढदिवस 1 जुलै रोजी असतो. परंतु, सपाच्या मुख्यालयात आता वाढदिवसाच्या शुभेच्छांचे होर्डिग्स लावण्यात आले आहे. ‘देश के भावी पंतप्रधान अखिलेश यादव जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाए’ असे या होर्डिंगवर लिहिले आहे. याशिवाय एक होर्डिंग आणखी लागले आहे. ‘बदला है यूपी, बदलेंगे देश’ असा मजकूर यावर लिहिला आहे.
सपाच्या कार्यालयात लागलेल्या या होर्डिंगने (Akhilesh Yadav) काँग्रेसला डिवचण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी काँग्रेस पक्ष देव पाण्यात ठेवून बसला आहे. अशात सपाने हे होर्डिंग लावून त्यांच्या भावनांना दुखावण्याचे काम केले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुळात, सपाच्या कार्यकर्त्यांना माजी अध्यक्ष मुलायमसिंग याादव यांना पंतप्रधानपदी बघायचे होते. आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना पंतप्रधान बघण्याची इच्छा आहे. यात गैर काय असे मत सपाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी यांनी बोलून दाखवलं आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar : या यात्रेकडे दुर्लक्ष करू नका; शरद पवारांचा सरकारला इशारा)
ते पुढे म्हणाले की, “दिल्लीच्या सिंहासनाचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो. आणि भाजपला सपाच्या सहकार्याशिवाय हरविणे शक्य नाही. अशात, (Akhilesh Yadav) अखिलेश यादव यांनी पंतप्रधान व्हावे ही पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल तर त्यात काहीही गैर नाही.
सपा मध्यप्रदेशचा बदला यूपीत घेत असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस मध्यप्रदेशात सपाला भाव देत नाही आहे. अशात, सपाने (Akhilesh Yadav) नवा डाव खेळला आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरून काँग्रेस सपामध्ये वाद सुरू आहे. त्यात सपाने पंतप्रधानपदावर केलेला हा दावा. यामुळे इंडिया आघाडीत फूट पडत असल्याचे बोलले जात आहे. (Akhilesh Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community