Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!

117
Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!
Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून घेऊन येत असताना त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर उत्तरादाखल झालेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार (Akshay Shinde Encounter) झाला. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत.

मुंबईतल्या काही भागांमध्ये ‘बदलापुरा’ हे लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर या पोस्टरवरती (Akshay Shinde Encounter) देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे यातील अनेक पोस्टर्सवर राजकीय पक्षाची ओळख नसल्याने लोकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात कुतूहल आणि वाद निर्माण झाला आहे.

स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली
याशिवाय, काही भागात भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून, त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. अशाच एका बॅनरवर दावा केला आहे की, “MVA च्या काळात पोलिस सरकारसाठी पैसे गोळा करायचे, आता पोलिस जनतेचे रक्षण करतात.” बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळ्या घातल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. (Akshay Shinde Encounter)

अक्षयचा मृत्यू कसा झाला?
अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटल्या. आता बदलापुराची चर्चा रंगली आहे. (Akshay Shinde Encounter)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.