केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा कथित अवमानकारक उल्लेख केला होता, त्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कथित अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
17 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कथित अवमानकार शब्द वापरल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसैनिक सिध्देश पाटेकर यांनी राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिद्धेश पाटेकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात नारायण राणे यांची अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी निर्देष सुटका केली आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने नारायण राणे यांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर: किराडपुरा दंगलीप्रकरणी आणखी ४ जण गजाआड)
Join Our WhatsApp Community