शिवसेनेचा दुसरा आमदार आला अडचणीत

127

अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने मारहाण प्रकरणात आमदार दळवी यांच्यासह इतर 4 जणांना दोषी ठरवले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दळवी यांना 2 वर्षांचा साधा कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र काही वेळेतेच दळवी यांनी वरच्या न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

नक्की प्रकरण काय?

अलिबाग तालुक्‍यातील एका गावात 2014 मध्ये मारहाणीची घटना घडली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळेस हा सर्व राडा झाला होता. या प्रकरणी दळवी यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. अलिबाग सत्र न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणावरुन निकाल दिला. न्यायालयाने या वेळेस आमदार दळवी यांच्यासह अनिल पाटील, अंकुश पाटील आणि अविनाश म्हात्रे यांना दोषी ठरवले. यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 324, 143, 147, 148, 504, 506 तसेच मुंबई पोलीस ॲक्ट 134 नुसार दोषी ठरवण्यात आले.

(हेही वाचा धक्कादायक! भायखळ्याच्या सेंट अँड्र्यूज शाळेकडून उन्हाळी सुटीत ख्रिस्ती धर्मप्रसार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.