मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सततच्या दौ-यामुळे विश्रातींचा सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुरुवारच्या होणा-या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटेपर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे. डाॅक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुरुवारी एक दिवसाच्या होणा-या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या दौ-यावर होते. त्यानंतर सातत्याने ते वेगवेगळ्या सभांमध्ये सहभागी होत होते. याचा सर्व ताण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यावर पडल्याने, डाॅक्टरांनी त्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद् करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: Supreme Court: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ‘असा’ झाला युक्तीवाद )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here