नवी मुंबईतील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारामुळे सर्व आश्रमशाळांची चौकशी करणार – आदिवासी विकासमंत्र्यांची घोषणा

139

नवी मुंबईतील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ या चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींना अटक करण्यात आली असली, तरी अशा प्रकारच्या घटना अन्य सर्वच चर्चप्रणीत आश्रमशाळा आणि वसतीगृहे यांमध्ये होत नाही ना, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी आदिवास विकास विभागाचे राज्याचे सचिव यांना राज्यातील सर्वच आश्रमशाळा आणि वसतीगृहांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : प्रभागसंख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय चुकीचा होता! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले कारण )

नवी मुंबईतील चर्चप्रणीत आश्रम शाळेत लैंगिक अत्याचार

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना समोर आली. नवी मुंबर्इतील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्च अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत अनेक मुलींवर तेथील फादर येशूदासनने लैंगिक अत्याचार केले आहेत. या विषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवी मुंबर्इतील फादर येशूदासन याच्यासह अन्य जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवार्इ करावी, अशा चर्चप्रणीत आश्रमशाळांची नोंदणी रहित करणे, अशा आश्रमशाळांची चौकशी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, पोलीस यांचे महिला प्रतिनिधींची एक समिती नेमण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

धर्मांतर विरोधी कायदा करण्याची शिफारस करणार

राज्यात आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत आहे. पालघर जिल्ह्यासह अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यात धर्मांतराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाला धर्मांतरविरोधी कायदा करण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्याची मागणीही आदिवासी विकासमंत्र्यांनी मान्य केली. यावेळी आदिवासींचे धर्मांतर होऊ नये, तसेच आदिवासींना आर्थिक साहाय्य करण्यासाठी आदिवासी विभाग प्रयत्नशील असेल, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.