शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी काळातील अनेक निर्णय रद्द करण्याच धडाका मध्यंतरीच्या काळात लावला होता. त्यानंत आता पुन्हा एका शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या काळात घेण्यात आलेले म्हाडा संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – गिरगाव चौपाटीची स्वच्छता नौदल ‘काश’ कॉलेज विद्यार्थ्यांसह करेल!)
गृहनिर्माण विभागाचा कार्यभार हा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. घेण्यात आलेल्या नव्या निर्णयामुळे येथून पुढे सर्व अधिकार म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आल्याने म्हाडाला यापुढे कोणताही निर्णय घेताना सरकारवर अवलंबून रहावे लागणार नाही. आव्हाडांच्या काळात एखाद्या निर्णयासाठी म्हाडाला सरकारच्या परवानगीची वाट पाहावी लागत होती. परंतु आता सर्व निर्णय घेण्याची मुभा म्हाडा तसेच विभागीय मंडळाना देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी होती. महाविकास आघाडीच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना म्हाडा बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हाडाचे सगळे अधिकार काढून घेत ते सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचे काम फक्त प्रस्ताव तयार करणे आणि ते सर सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचे काम हे फक्त प्रस्ताव तयार करणे आणि ते सरकार दरबारी पाठवणं इतकच मर्यादित होतं. मात्र या नव्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community