राज ठाकरेंचा अल्टिमेटम… मुस्लिम संघटनांची धावाधाव

160
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे ३ मेच्या आत खाली उतरावा, अन्यथा त्यानंतर मशिदींसमोर दुप्पट संख्येने भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मुस्लिम संघटनांची धावाधाव सुरु झाली आहे. अल्टिमेटमच्या आधीच मशिदींवरील भोंगे अधिकृत करण्यासाठी पोलीस ठाण्यांकडे निवेदने जमू लागली आहेत.

मुस्लिम संघटनांनी काय केली मागणी? 

ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा या संघटनेन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील मशिदीवर लाऊडस्पीकर वापरासाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करु असे देखील या पत्रात म्हटले आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना ज्या मशिदींनी परवानगी मागितली आहे. त्यांना मुभा देण्याची सूचना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी द्यावी, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही मशिदीच्या ट्रस्टींना तात्काळ परवानगीसाठी पोलिसांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईड लाईन्स पूर्णपणे पालन मशिदीकडून केले जाईल असे म्हटले आहे. मुंबईतील प्रत्येक मशीदकडे लाऊडस्पीकरची परवानगी आहे. ज्या मशिदीकडे लाऊड स्पीकरची परवानगी नाही, ते परवानगी घेतील, असे रझा अकादमीने म्हटले आहे.
letter 1 1

आणखी वाद चिघळणार 

राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर मुस्लिम संघटना मशिदीवरून भोंगे खाली उतरवण्यास तयार नाहीत, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांचा वापर करण्याची तयारी मुस्लिम संघटनांनी दर्शवली आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही जर मशिदींसाठी हा नियम असेल तर तो सर्व धर्मियांना लागू करावा, त्यानुसार हिंदू मंदिरांवरही भोंगे लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे, त्यामुळे मुस्लिमांच्या नव्या भूमिकेमुळे आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.