पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० परिषदेच्या निमित्ताने सोमवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला देशातील सर्वच राज्यातील प्रादेशिक नेत्यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोदींच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला हजर होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दिल्लीत अनुपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – ‘त्या’ विधानावर ‘मनसे’ आक्रमक, सुषमा अंधारेंची ‘महाप्रबोधन’ सभा उधळून लावणार!)
काय म्हणाले एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले होते. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप करणारे उद्धव ठाकरेंनी गैरहजर राहून काय सिद्ध केले? हेच त्यांचे राज्यावरील देशप्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले. अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर जी-२० यजमानपद देशाला मिळणे ही खरेतर गौरवाची बाब असल्याचेही शिंदे म्हणाले.
१डिसेंबर२०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले.याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान @narendramodiजी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांचे मुख्यमंत्री व संसदेचे प्रतिनिधित्व करणारे पक्षांचे अध्यक्षांसोबत बैठक संपन्न pic.twitter.com/TasdYIEnXv
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 5, 2022
या बैठकीला देशातील सर्वच राज्यांमधील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यासारखे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community