राज ठाकरेंचा मोठा निर्णय! नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, ‘या’ दिवशी होणार नवी कार्यकारिणी जाहीर

153

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपुरात मनसेबाबत मोठा निर्णय घेत एक महत्त्वाची घोषणा केली. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी मनसेची नागपूरची कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्तारासंदर्भात चर्चा केली. यानंतर मी पक्षाची कार्यकारणी बरखास्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – राज ठाकरेंनी घेतली बावनकुळेंची भेट, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण; बावनकुळे स्पष्टच म्हणाले…)

राज्यात मनसेच्या स्थापनेनंतर १६ वर्षे झाली तरी विदर्भात पक्षाचं अस्तित्व नाही आहे. ज्या गतीने पक्षाचा विस्तार व्हायला हवा होता तो विस्तार झाला नाही. विदर्भात अनेक तरूण-तरूणी युवक मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना संभी देण्यात येणार आहे. त्यासाठी नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी नागपुरातील रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारणी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मनसेला विदर्भात पुन्हा पुनर्जिवित करण्यासाठी राज ठाकरे नागपुरात दाखल झाले. नागपूरच नाही तर अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक मनसे ताकदीने लढणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.