शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार : Eknath Shinde यांची ग्वाही

49
शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार : Eknath Shinde यांची ग्वाही
शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार : Eknath Shinde यांची ग्वाही

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल, तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वढू येथे आले असता शिंदे यांनी हे वक्तव्य केले. (Eknath Shinde)

हेही वाचा-महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि डौलाने उभारूया ; Eknath Shinde

यावेळी बोलताना शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत आहे. आज त्याच कर्तव्यभावनेतून आपण सारे इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत असे सांगितले. आजच्या शुभदिनी रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने हिंदू धर्मासाठी त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. (Eknath Shinde)

हेही वाचा- PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखल ; शहरात ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची चर्चा

मी मुख्यमंत्री असताना मी नाशिक येथील त्यांच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र तेव्हाही राज्यात जोवर महायुती सरकार आहे तोपर्यंत साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे मी सांगितले होते त्याची आठवण शिंदे यांनी करून दिली. देशात गोमातेला ‘राज्य माते’चा दर्जा देणारे पहिले राज्य आपले होते. गोसेवा करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनेच घेतला होता. यापुढे गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देखील दूर करून त्यानाही गरज पडेल तेव्हा संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (Eknath Shinde)

हेही वाचा- Gudi Padwa 2025 : पराक्रमाची गुढी उभारूया !

मी मुख्यमंत्री असताना वढू आणि तुळापूर येथील स्मारकासाठी 400 कोटी रुपये मंजूर केले होते. इथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य असे स्मारक उभारणे त्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. त्यासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.