Tirumala Tirupati Devasthanam मध्ये सर्व कर्मचारी हिंदूच असावेत; अध्यक्ष नायडू यांचे विधान

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (Tirumala Tirupati Devasthanam) अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली हे आपले भाग्यच असल्याचे नायडू म्हणाले.

44

मधल्या काळात प्रसादातील अशुद्धतेमुळे वादात सापडलेले आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी या मंदिराच्या (Tirumala Tirupati Devasthanam)  बोर्डाच्या अध्यक्ष पदी बीआर नायडू यांची नियुक्ती झाली आहे. नायडू यांनी, तिरुपती बालाजी मंदिरात सर्व कर्मचारी हिंदू असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

(हेही वाचा Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन)

वायएसआर काँग्रेसवर टीका 

तिरुमला येथे काम करणाऱ्या इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यावा, याविषयी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारशी बोलणार असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (Tirumala Tirupati Devasthanam) अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली हे आपले भाग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मोठी जबाबदारी दिल्याबद्दल बीआर नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आभार मानले आहेत. तसेच, त्यांनी आधीच्या जगन मोहन रेड्डी सरकारवर हल्लाबोल केला. नायडू म्हणाले की, वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाल्या होत्या. तिरुमला तिरुपती मंदिराचे (Tirumala Tirupati Devasthanam) पावित्र्य राखले गेले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.