महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आक्रमक! ‘या’ दिवशी पुकारला ‘महाराष्ट्र बंद’

150

उत्तर प्रदेशातील हत्याकांडाचे पडसाद राज्यात देखील उमटत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते हे सातत्याने लखीमपू खेरी येथील शेतकरी हत्याकांडावरुन भाजपाला टीकेचे धनी करत आहेत. आता तर या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्य मंत्रीमंडळात चर्चा होऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे येत्या 11 ऑक्टोबर रोजी राज्यभर महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार आहे.

(हेही वाचाः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की ‘रक्त महोत्सव?’ सामनातून केंद्र सरकारवर आगपखड)

काँग्रेसच्या हाकेला शिवसेना-राष्ट्रवादीची साद

लखीमपूर खेरी येथील घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चांगलेच आक्रमक झाले असून, देशभरातील काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा या घटनेच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंदचा नारा दिला होता. त्याला आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी दुजोरा दिल्यामुळे 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार आहे.

(हेही वाचाः इंग्रजांना हाकललं आता मोदी सरकारलाही हाकलून देऊ! ‘या’ काँग्रेस नेत्याचे मोठे विधान)

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

शेतकरी हत्याकांडाच्या निषेधासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद सरकारतर्फे नसून सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वतीने करण्यात येणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय एकमताने मान्य झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचाः त्यांच्या डोळ्यांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार! सामनातून प्रियंका गांधींवर स्तुतीसुमने)

शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या हिंसाचाराबाबत खेद व्यक्त करण्यात आला तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. क्रूरपणाने शेतकरी आंदोलन चिरडण्याचा हा भाजपाचा डाव आहे. अजूनही यातील आरोपींना अटक देखील झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेचा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष निषेध करत आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचाः एनसीबीची क्रूझवरील छापेमारी बनावट! भाजपाचा उपाध्यक्ष होता कारवाई पथकात! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.