हिंदू विवाह कायद्यांतर्गत (Hindu Marriage Act) ‘कन्यादान’ आवश्यक नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच ‘सप्तपदी’ (Saptapadi) हा विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा समारंभ आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लखनौ येथील आशुतोष यादव नावाच्या व्यक्तिद्वारे दाखल एका पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. (Allahabad High Court)
(हेही वाचा – Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची बिनविरोध निवड )
दरम्यान, यादव यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या वेळी कायद्यानुसार ‘सप्तपदी’ हा लग्नादरम्यान एक अत्यावश्यक समारंभ असून ‘कन्यादान’ हा आवश्यक समारंभ नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच यादव यांची पुनर्विचार याचिका रद्द केली.
काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी आशुतोष यादव यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सत्र न्यायालयाने यादव यांच्या विरोधात निकाल दिला होता. या वेळी सत्र न्यायालयात बोलताना यादव यांनी ‘त्यांच्या लग्नात कन्यादान (Kanyadaan) आवश्यक असून हा सोहळा पार पडला नाही’, असा दावा केला होता. सत्र न्यायालयाने विरोधात निर्णय दिल्यानंतर यादव यांनी उच्च न्यायालयात (Allahabad High Court) पुनर्विचार दाखल केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community