दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सोमवारी, ६ मे रोजी घेतलेला निर्णय आम आदमी पक्षाच्या (AAP) अडचणी वाढवणारा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेकडून कोट्यवधींचा निधी घेतल्याचा आरोप झाला आहे. या आरोपाची एनआयएकडून चौकशीची करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे.
गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात राज्यपाल सक्सेना यांनी म्हटले की, हे आरोप मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तसेच भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेकडून आम आदमी पक्षाला (AAP) मिळालेल्या लाखो डॉलर्सच्या निधीशी संबंधित आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अन्य वस्तूंची न्याय वैद्यक चाचणी करण्याची आवश्यकता आहे.
Delhi LG, VK Saxena has recommended an NIA probe against Delhi CM Arvind Kejriwal for allegedly receiving political funding from the banned terrorist organization “Sikhs for Justice”
LG had received a complaint that Arvind Kejriwal-led AAP had received huge funds – USD 16… pic.twitter.com/11wzfXvgmo
— ANI (@ANI) May 6, 2024
खलिस्तानी गट
याविरोधात वर्ल्ड हिंदू फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस आशु मोंगिया आणि आम आदमी पार्टीचे (AAP) माजी कार्यकर्ते मुनीश कुमार रायजादा यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारदाराने एक व्हिडीओ सादर केला आहे, ज्यामध्ये शिख फॉर जस्टिसचा (SFJ) म्होरक्या गुरपतवंत पन्नू म्हणतो की, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला 2014 आणि 2022 दरम्यान खलिस्तानी गटांकडून 16 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका निधी मिळाला होता.
(हेही वाचा AAP ला आणखी मोठा धक्का; आता वक्फ घोटाळ्याप्रकरणी आमदार अमानतुल्ला खान गजाआड)
खलिस्तानशी संबंध
तक्रारदार रायजादा यांनी या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. AAP नेते संजय सिंह हे वारंवार कॅनडाला भेट देतात. यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी आणि SFJ नेते गुरपतवंत पन्नू याने आरोप केला होता की, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या दोघांनी खलिस्तानी सहकारी जगदीश सिंग, मनजीत सिंग आणि देवेंद्र पाल भुल्लर या तिघांना सोडण्याचे आश्वासन दिले होते, त्याबदल्यात त्यांनी कोट्यवधींचा निधी घेतला होता; परंतु आता ते त्यांच्या आश्वासनापासून दूर गेले आहेत. या तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
‘आप’ची प्रतिक्रिया
यावर ‘आप’चे (AAP) मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपाच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात हे आणखी एक मोठे षडयंत्र रचण्यात आले आहे. निवडणुकीत पराभव होत असल्याच्या भीतीने हे प्रकार केले जात आहेत. भाजपा दिल्लीतील सर्व सात जागांवर पराभूत होणार आहे.
Join Our WhatsApp Community