सिद्धीविनायक मंदीर प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्यावर अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आले आहेत. त्यानंतर आदेश बांदेकर अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आदेश बांदेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. यानंतर आता पुन्हा मनसे नेते मनोज चव्हाण यांनी बांदेकरांना घेरले आहे.
(हेही वाचा – वीर सावरकरांच्या दूरदृष्टीवर आधारित भारताने संरक्षण धोरणे आखली असती तर भारत महासत्ता असता – उदय माहूरकर)
सिद्धीविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी प्रसिद्ध केली जाते. परंतू यंदा ती काढण्यात आली नाही, याला आदेश बांदेकरच जबाबदार असल्याचे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आरोप केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरेंचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती असून याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा मनोज चव्हाण यांनी केला आहे.
बांदेकरांनी आरोप फेटाळले
गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे सिद्धीविनायक न्यास मंदिराकडून ही डायरी छापली गेली नाही. आर्थिक खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी डायरी छापण्यात आली नाही, असे आदेश बांदेकर यांनी सांगितले. तर मनसेचे हे आरोप केवळ राजकीय हेतूने केले जात आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community