देशात सामाजिक असमतोल, जातीय भेदभाव होत आहे, अशा आशयाचा आरोप काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका मुलाखतीत केला. त्यावर ते सोशल मीडियात जोरदार ट्रोल होऊ लागले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) मागील काही दिवसांपासून देशात आणि परदेशात बोलताना भारताची बदनामी करत आहेत. भारतात उच्च वर्णियांना शिक्षण आणि नोकरीमध्ये प्राध्यान्य दिले जात आहे, पण दलित आणि आदिवासीयांना संधी डावलली जात आहे, असे वारंवार म्हणत आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
भारतात देशात सामाजिक असमतोल आहे. त्यात गुणवत्तेवर पूर्णतः चुकीची धारणा दिसून येत आहे. जर कुणी म्हणाले कि आमची शिक्षण प्रणाली आणि नोकरशाहीमध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी यांना समाविष्ट करण्याबाबत निष्पक्ष नाही. कारण सांस्कृतिक रूपात हा समुदाय जोडलेला नाही. त्यामुळे सगळे नेरेटिव्ह हे उच्च जातीचे नेरेटिव्ह आहे. गुणवत्तेची धारणा अन्यायपूर्वक आहे, असे काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका मुलाखतीत बोलताना म्हणाले.
राहुल गांधी कसे होतात ट्रोल?
- अभिषेक पांडे यांनी, हा मुद्दा राहुल गांधी (Rahul Gandhi) व्हिएतनाम येथून शिकून आले आहेत, असे म्हटले आहे.
- अवधेश मिश्रा म्हणाले, ७० वर्षांत, काँग्रेसने मागासलेल्या आणि आदिवासी दलितांना शिक्षण न देऊन ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केले. प्रत्येक गरिबाच्या घरी अन्न पुरवणे आवश्यक मानले नाही परंतु त्यांना तांदळाच्या पोत्या देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले.
Join Our WhatsApp Community