आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू’; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल

180
आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू'; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर (PM Narendra Modi, Chimur) येथे जाहीर सभेत जनतेला संबोधित केले. या जाहीर सभेत मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात महायुती सरकार (Mahayuti) आणि केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार म्हणजे विकासाचा वेग दुप्पट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.    (PM Narendra Modi)

‘आघाडी, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू’

पंतप्रधान म्हणाले की, ‘गेल्या अडीच वर्षांत तुम्ही विकासाचा दुप्पट वेग पाहिला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक विदेशी गुंतवणूक असलेले राज्य आहे. नवीन विमानतळ आणि द्रुतगती मार्ग आहेत, डझनभर वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि १०० हून अधिक रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. दरम्यान, विरोधकांनी विकास रोखण्यासाठी पीएचडी केली असून काँग्रेसची (Congress) यात दुहेरी पीएचडी आहे. आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.  

‘आघाडींच्या गटाने काम बंद पाडले’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रात भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात महायुती म्हणजे राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. म्हणजे दुप्पट वेगाने विकास. “हे महायुती सरकार असून कोणत्या गतीने काम करते आणि आघाडीची ही मंडळी कामे कशी थांबवते हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगले कोणाला माहीत असेल.” अनेक दशकांपासून येथील लोक रेल्वे जोडणीची मागणी करत होते, पण काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही.

(हेही वाचा – मविआचे महिलांना ३ हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन; Ajit Pawar यांनी मांडला हिशेब, म्हणाले…)

चिमूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे – ‘भाजप – महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.’ महाराष्ट्रात निवडणुकीचे काय निकाल लागणार आहेत, हे आज तुम्हीच दाखवून दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. महाराष्ट्रात महायुती प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे ही गर्दी सांगत आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.