मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय

66
मुंबईत मेरिटनुसार ठरणार विधानसभेचे जागावाटप; Mahavikas Aghadi च्या बैठकीत निर्णय
  • प्रतिनिधी

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबईत मेरिटनुसार जागावाटप ठरविण्यात येणार आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी सहा ते सात जागांवर अद्याप तिढा सुटलेला नाही. पुढील दोन दिवस आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महत्त्वपूर्ण बैठका होणार असून यावेळी उर्वरित राज्यातील जागांवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

विधानसभेच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपावर गेल्या महिन्याभरापासून खल सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी आघाडीच्या तीन बैठका झाल्या. बुधवारी (१८ सप्टेंबर) वांद्रे येथील सॉफिटेल हॉटेलमध्ये चौथी बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून (ठाकरे) खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

(हेही वाचा – ISRO: चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेनंतर आता भारताची शुक्रावर स्वारी; व्हिनस मिशनला कॅबिनेटची मंजुरी)

दरम्यान, तीनही पक्षांनी विभागवार अहवाल मांडले. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करून विभागवार आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला आघाडी मिळाली होती. प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत, यावर सल्ला मसलत करण्यात आली. तसेच कोणत्या मतदारसंघात कोणात्या पक्षाची ताकद जास्त आहे, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, हा निकष समोर ठेवून जागावाटप करण्यावर भर देण्यात आला होता. (Mahavikas Aghadi)

मुंबईतील ३६ जागांचे वाटप पूर्ण करण्यासह काही जागांवर असलेला तिढा लवकर सोडविण्यात येईल. काँग्रेसचे नेते व्यस्त असल्यामुळे आघाडीच्या बैठकीबाबत तारखांवर तारखा पडल्या होत्या. आता पुढील दोन दिवस सलग बैठका घेऊन मुंबई सह राज्यातील जागावाटपाचा निर्णय एकमताने घेण्यात येणार असल्याचे समजते. (Mahavikas Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.