मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा- दांडिया खेळण्याची परवानगी द्या; आमदार प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

135

गणेशोत्सवानंतर आता अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. अशातच गेल्या दोन वर्षांत कोरोना निर्बंधात हा उत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र आता कोरोनामुळे घातलेले निर्बंध नवरात्रीच्या काळात मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा- दांडिया खेळण्याची परवानगी आहे, हे पाहता महाराष्ट्रातही तशी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

सुर्वे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना संकटात दोन वर्षांनतर नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकारने या उत्सवाच्या वेळेबाबत आणि इतर नियमांबाबतचे सर्व निर्बंध हटवावेत. यासोबतच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी गरबा आणि दांडियाच्या वेळा रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

( हेही वाचा: BMC निवडणुकीत तिकिटाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक )

… म्हणून रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी द्या

सध्या महाराष्ट्रात नवरात्रोत्सव साजरा करण्याची आणि नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी आहे. याशिवाय उर्वरित आठ दिवस रात्री 10 वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे. हे पाहता यावेळी दररोज रात्री 12 गरबा खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.