सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजपचा ‘लोकल’ प्रवास!

लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. त्यानंतर आता भाजपही सामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आक्रमक झाला आहे. 

115

मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी देण्यात येत नाही, त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार वर्गाची गैरसोय होत आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने अखेर शुक्रवारी, ६ ऑगस्ट रोजी थेट लोकलने प्रवास करून आंदोलन केले. एका बाजूला चर्चगेट येथे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे कांदिवली रेल्वे स्थानकाकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले. याशिवाय दहिसर, अंधेरी, घाटकोपर रेल्वे स्थानकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता मा. न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितले आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु मा. न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?
– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात! 

सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत प्रवेश केला आणि सविनय कायदेभंग करत थेट लोकलमध्ये शिरकाव केला. चर्चगेट, कांदिवली, दहिसर, अंधेरी, घाटकोपर या रेल्वे स्थानकांत आंदोलनाल करण्यात आले. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. शिवाय, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले गेले. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तिकीट मागितले मात्र त्यांना तिकीट देण्यात आले नाही.

bhat

(हेही वाचा : लसींचे २ डोस घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकल प्रवास करुद्या!)

न्यायालयानेही सरकारला फटकारले!

सार्वजनिक वाहनांतील गर्दी चालू शकते, मग उपनगरीय रेल्वेप्रवासाला मज्जाव का? अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्याच्या निर्बंधांतील विसंगतीवर बोट ठेवले. मुंबई आणि अन्य शहरे यांचे स्वरूप आणि त्यांच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. मुंबईसाठी लोकल प्रवास महत्वाचा आहे, त्यामुळे लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. त्यानंतर भाजप लोकल प्रवासाबाबत आक्रमक झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.