-
सुजित महामुलकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रमुख शरद पवार यांनी जरी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय मान्य न करता EVM वर खापर फोडत भाजपाने गडबड केल्याची शंका व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादीचे (शप) प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत जनतेने महायुतीला दिलेला कौल प्रामाणिकपणे मान्य केल्याची कबुली दिली. (Sharad Pawar)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : रोहित शर्माची धोनी आणि विराटच्या या नकोशा विक्रमाशी बरोबरी)
पवारांकडून शंका
गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी विधानसभा अपयशाचे खापर EVM वर फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. रविवारी शरद पवार यांनी मारकटवाडी या गावाला भेट देत EVM विषय कसा पेटत राहील, असा प्रयत्न केला. (Sharad Pawar)
बेरोजगारी, महिला अत्याचार, संविधान चालले नाही
जयंत पाटील यांनी विधानसभेत विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पाठिंबा देताना महाविकास आघाडीला जनतेने नाकारले अशी अप्रत्यक्ष कबुली दिली. ते म्हणाले, “आमचं काही तुम्हाला चैलेंज नाही. तुम्ही २३७ वर आलेला आहात. तुम्हाला विरोध करत करत आम्ही महागाईवर भाषणे केली बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, संविधानावर जास्त जोर नव्हता माझा. जे जे मुद्दे आम्ही जनतेपुढे मांडले त्यावर जनतेने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता चांगले सरकार तुम्ही चालवाल, अशी अपेक्षा आहे,” असे पाटील म्हणाले.
(हेही वाचा- शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर)
फडणवीस जात ताकदीने आले
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) पाटील पुढे म्हणाले की, “फडणवीस म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’ आणि पाच वर्षांनी आले. फडणवीस यांनी विरोधी पक्षाशी संवाद साधण्याचा आता प्रयत्न केला, त्याचे आपण स्वागत करतो,” असे पाटील म्हणाले. पाटील पुढे म्हणाले, “फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. आणि आज ते जास्त ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो.”
हेही पहा-
Join Our WhatsApp Community