NDA : लोकसभेत घटले पण राज्यसभेत वाढणार!

233
NDA ला एकत्र ठेवणे भाजपासाठी तारेवरची कसरत
  • वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी राज्यसभेत रालोआची ताकद वाढणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यसभेतील भाजपाचे सात तर विरोधी पक्षांचे तीन असे १० खासदार निवडून आले आहेत. या सर्व जागांवर भाजपाप्रणित रालोआचा झेंडा फडकणार आहे. यानंतर राज्यसभेतील रालोआ खासदारांची संख्या १२० वर पोहचणार आहे. तर भाजपाची संख्या ९९ होईल. (NDA)

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या घटल्यामुळे इंडी आघाडीतील घटक पक्षांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परंतु, हा आनंद औटघटकेचा ठरणार असून लवकरच त्यावर विरजण पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची लोकसभेत घटलेल्या ताकदीची उणीव लवकरच भरून निघणार आहे. १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे २४० खासदार निवडून आले आहेत. १७ व्या लोकसभेत भाजपा खासदारांची संख्या ३०३ एवढी होती. आता भाजपाची संख्या कमी झाल्यामुळे विरोधी पक्षांना आनंद होत आहे. मात्र, हा आनंद फार काळ टिकणार नाही हेही तेवढेच खरे आहे. (NDA)

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेतील १५ खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. यातील सात जण निवडून आले आहेत. तर, इंडी आघाडीचे राज्यसभेतील तीन खासदार लोकसभेत निवडून आले आहेत. थोडक्यात, राज्यसभेतील १० खासदार लोकसभेत निवडून आले आहे. जे दहा खासदार लोकसभेसाठी निवडून आले आहेत त्या पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले (महाराष्ट्र), कामाख्याप्रसाद तासा आणि सर्वानंद सोनोवाल (आसाम), मीसा भारती आणि विवेक ठाकूर (बिहार), दीपेंद्र सिंह हुड्डा (हरियाणा), ज्योतिरादित्य सिंधिया (मध्यप्रदेश), के. सी. वेणुगोपाल (राजस्थान) आणि बिप्लवकुमार देव (त्रिपुरा) यांचा समावेश आहे. (NDA)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पी. टी. उषाला भारताकडून किमान १० पदकांची अपेक्षा)

अशात, या सर्व खासदारांना लवकरच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा द्यावा लागेल. राजीनाम्यानंतर या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेतली जाईल. या निवडणुकीत भाजपाप्रणित रालोआचा वरचष्मा राहणार आहे. कारण ज्या राज्यांमध्ये ही निवडणूक होणे आहे तेथे भाजपा किंवा भाजपाप्रणित आघाडीचे सरकार आहे. यामुळे सर्व १० जागांवर रालोआचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता जास्त आहे. (NDA)

राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या २५० आहे. त्यापैकी २३८ विविध राज्यांच्या विधानसभा सदस्यांद्वारे निवडले जातात आणि १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जातात. राष्ट्रपती कला, साहित्य, ज्ञान आणि सामाजिक सेवेत असलेल्या नामनिर्देशित करतात. राज्यसभेतील काही जागा आधीपासूनच रिक्त आहेत. ४ जूनपर्यंत राज्यसभेत २४० सदस्य होते. सध्या दहा जागा रिक्त झाल्याने ही संख्या २३० वर आली आहे. यात भाजपाचे ९० सदस्य आहेत. यामध्ये पाच नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश आहे. (NDA)

एनडीएच्या सदस्यांची संख्या ११० आहे

एनडीएच्या सदस्यांची संख्या सध्या ११० आहे. दहा जागांच्या निवडणुकीनंतर राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या पुन्हा २४० होईल आणि एनडीएच्या सदस्यांची संख्या १२० वर पोहोचेल. भाजपा पहिल्यांदाच राज्यसभेत ९९ चा आकडा गाठणार आहे. (NDA)

लोकसभेत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे पूर्ण बहुमत आहे. पण राज्यसभेतील सत्ताधारी पक्ष आतापर्यंत बहुमताच्या आकड्यापासून थोडा दूर होता. त्यामुळे महत्त्वाची विधेयके लोकसभेत मंजूर झाली असली तरी ती राज्यसभेत अडकून पडायची. आता निवडणुकीनंतर एनडीएला दोन्ही सभागृहात पुरेसे बहुमत मिळणार आहे. (NDA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.