-
सुजित महामुलकर
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी शिवसेना उबाठा गट बाशिंग बांधून तयार असला तरी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सत्ताधारी महायुतीकडून उबाठाला विरोधी पक्ष नेते पद मिळण्याची शक्यता नाही अशी चिन्हे दिसत आहेत. (MVA)
बदल्यात परिषद विरोधी पक्ष नेते पद
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना उबाठा यांच्यात विरोधी पक्ष नेते पदावरून वाद असला तरी महाविकास आघाडीतर्फे विरोधी पक्ष नेते पदासाठी शिवसेना उबाठाच्या भास्कर जाधव यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे (शप) समर्थन देण्यात आले आहे. या समर्थनाच्या बदल्यात शिवसेना उबाठाला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद सोडावे लागण्याची अट काँग्रेसने घातली असल्याचे समजते. (MVA)
(हेही वाचा – अणुशक्तीनगर मतदारसंघातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे DCM Ajit Pawar यांचे निर्देश)
भाजपाचे १२ आमदार वर्षासाठी निलंबित
शिवसेना उबाठाच्या भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे मुखमंत्री असताना ‘मविआ’च्या काळात जुलै २०२१ मध्ये तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. त्यानंतर भाजपाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली आणि आमदारांचे निलंबन मागे घेतले गेले.
या गोष्टीचा राग भाजपामध्ये आहेच, शिवाय ज्या पक्षाचे किमान १० टक्के आमदार निवडून येऊ शकले नाहीत, अशा पक्षाला विरोधी पक्ष नेते पद का द्यावे? असा तात्विक प्रश्न भाजपाच्या अंतर्गत गोटात उपस्थित केला जात आहे. (MVA)
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींना अटक होणार?)
नियम की निर्देश?
सदस्यसंख्येची अट कायद्यात कुठेही नसली तरी लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश आहेत, त्यामुसार सभागृहाच्या एकूण संख्येपैकी किमान १० टक्के सदस्यसंख्या असलेल्या पक्षाला सभागृहात मान्यता मिळेल. त्यामुळे शिवसेना उबाठाला विरोधी पक्ष नेते पद मिळेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या विषयासंदर्भात अभ्यास करण्यात येणार असून किमान या चालू अधिवेशनात तरी महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही, अशी शक्यता आहे. (MVA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community