शिवसेना उबाठा आमदार भास्कर जाधव यांनी थेट पक्ष नेतृत्वाविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपाकडून विरोधी पक्ष (uncertainty BJP Leader of Opposition) नेते पद मिळेल की नाही याची अद्याप शाश्वती नाही. असे असताना शिवसेना उबाठामध्ये (Shiv Sena UBT) विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावरून आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Shiv Sena UBT)
आमदारकी वाचवण्यासाठी २/३ सदस्य
गेले काही दिवस शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. याचा फायदा घेत उबाठा आमदार भास्कर (Bhaskar Jadhav) जाधव यांनीही संधी सोडली नाही. जाधव यांना एकट्याला पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत जाता येणे शक्य नाही, कारण त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. आमदारकी वाचवण्यासाठी त्यांना दोन-तृतीयांश आमदारांसह शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, अन्यथा २/३ सदस्य पक्ष सोडण्यासाठी तयार होतील यांची वाट पाहाण्याखेरीज गत्यंतर नाही.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी रवाना)
उबाठाचे पारडे जड
याव्यतिरिक्त उबाठामध्ये सक्रिय आणि पावरफुल नेता म्हणून राहायचे असल्यास मोठे पद हवे. उबाठाला आता पुढील चार वर्षे केवळ विधानसभा विरोधी पक्ष नेते पद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यावरही कॉंग्रेस दावा करत आहे. मात्र उबाठाची सदस्य संख्या अधिक असल्याने कॉँग्रेसपेक्षा उबाठाचे पारडे जड आहे.
उबाठा नरमले
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिवसेना उबाठाकडून त्यांच्याबाबत नरमाईचे धोरण अवलंबले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीच्या महिना-दीड महिनाभरातच तीन वेळा फडणवीस यांची भेट घेतली आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रयत्न केले. शिवसेना उबाठामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नावाला पक्षातूनच विरोध होत आहे. मात्र भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याकडून विरोधी पक्ष नेते पदासाठीच प्रयत्न सुरू असून पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका हा त्याचाच एक भाग असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – एलईडी आणि अनधिकृत मच्छीमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन; मंत्री Nitesh Rane यांची माहिती)
क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी नाही
तीन दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी मनातील खंत बोलून दाखवली. माध्यमांसमोर त्यांची खदखद बाहेर आली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे आणि महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात कुठेही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. तसेच खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं सतत आडवं आलं. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे जाधव यांनी सांगितले.
ही शेवटची संधीही
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी जाधव हे शरद पवार यांची साथ सोडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गोटात गेले. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळाले, पण उद्धव ठाकरे यांनी जनमताचा कौल झुगारत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून ‘मविआ’ सरकार स्थापन केले. त्यावेळीही ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री असून आपल्या मंत्रीमंडळात जाधव यांना स्थान दिले नाही. आता २० आमदारांमध्ये उबाठाकडून आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते पदावर बसवण्याची तयारी होत असताना ही शेवटची संधीही हुकणार, या भीतीपोटी भास्कर जाधव यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे आणि प्रसंगी पक्ष नेतृत्वावर टीका सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community