Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींची संख्या १३ लाखांनी वाढली; कमी झाल्याची केवळ अफवा

43
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींची संख्या १३ लाखांनी वाढली; कमी झाल्याची केवळ अफवा
  • सुजित महामुलकर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली ती विधानसभा निवडणुकीनंतर. याचे कारण म्हणजे महायुतीला झालेले भरघोस मतदान आणि अभूतपुर्व विजय. गेल्या काही दिवसात या लाडक्या बहिणींची संख्या कमी झाल्याची चर्चा होत असली तरी ती अफवा असून प्रत्यक्षात मात्र निवडणुकीनंतर ही संख्या १३ लाखांहून अधिक वाढली आहे. (Ladki Bahin Scheme)

फेब्रुवारी महिन्याच्या लाभार्थी २.४७ कोटी

राज्यं विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च पासून सुरू झाले. बुधवारी १२ मार्च २०२५ या दिवशी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेवरून विधानसभेत चर्चा झाली. रोहित पवार, संतोष दानवे, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, योगेश सागर अशा जवळपास ३४ आमदारांनी या विषयावर प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला २ कोटी ३३ लाखांहून अधिक होत्या, तर फेब्रुवारी २०२५ या महिन्याचा लाभ २.४७ कोटी महिलांसाठी देण्यात आला. (Ladki Bahin Scheme)

(हेही वाचा – Russia चा युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला )

संख्या कमी झाल्याची अफवा

आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची संख्या कमी झाल्याबाबत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली नाही तर केवळ न्यूज चॅनलने ती बातमी चालवली किंवा बहिणींची संख्या कमी झाल्याची अफवा होती. लाडक्या बहिणींची प्रसिद्ध झालेली आकडेवारी ही महिला व बालकल्याण विकास विभागाची नव्हती, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. (Ladki Bahin Scheme)

अन्य योजनेतील फरक

अधिक माहिती देताना तटकरे म्हणाल्या की, नमो कृषि योजनेतील महिलांना जर १,००० रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून वरचे ५०० रुपये देण्यात येतात. त्यामुळे अन्य योजनेच्या लाभार्थी असतील तरी त्यातील फरक सरकारकडून देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. (Ladki Bahin Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.