आमदार संतोष बांगर हल्ल्याप्रकरणी 11 संशयित ताब्यात; हल्ल्यानंतर बांगर यांचे शिवसैनिकांना आव्हान

121

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी रविवारी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी आता 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे हा हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणावर बोलताना, संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना आव्हान दिले आहे. माझ्या गाडीच्या काचेला टच करुन दाखवा, असं म्हणत त्यांनी खुलं चॅलेंजच शिवसैनिकांना केले आहे. तसेच, माझ्या गाडीत जर त्यावेळी घरातील लोक नसते तर मी त्या हल्लेखोर शिवसैनिकांना दाखवलं असतं, असेही त्यांनी म्हटले आहे.

संतोष बांगर यांचे शिवसैनिकांना आव्हान

रविवारी गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर, संतोष बांगर आक्रमक झाले आहेत. या हल्ल्यावरुन संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना आव्हान दिले आहे. हे असे प्रकार चोट्टे लोक करतात. संतोष बांगरवर हल्ला करायला वाघाचे काळीज लागते. चोरासारखा हल्ले करणारे शिवसैनिक कसले? डाका काय असतो माहिती आहे का? असा सवाल बांगर यांनी केला आहे. तसेच रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर माझे कार्यकर्ते रात्रभर झोपलेले नाहीत. पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत, असे वक्तव्य बांगर यांनी केले आहे.

( हेही वाचा: नवरात्रीनिमित्त बेस्टची मुंबईकरांसाठी खास ऑफर; 19 रुपयांत करू शकता 10 बसफेऱ्या; असा घ्या लाभ )

काय आहे नेमके प्रकरण? 

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर रविवारी अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत, त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला चढवला. यावेशी शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओके असे नारे दिले. संतोफ बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगाव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहनांसमोर आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते, परंतु बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.