पुन्हा हनुमान चालिसा वाचली तर… नवनीत राणांना धमकीचा फोन

146

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी नवी दिल्लीतील नाॅर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागच्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठण हा विषय राणा दाम्पत्याने हाती घेतला आहे. नवनीत यांना मोबाईल फोनद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना मंगळवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला.

नवनीत राणा यांना धमकीचा फोन करणा-या व्यक्तीने महाराष्ट्रात येऊ देणार नाही, तसेच सार्वजनिकरित्या हनुमान चालिसाचे पठण केल्यास, जीवे मारु अशी धमकी दिली. धमकी देणा-या व्यक्तीचे नाव कादरी असल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे.

( हेही वाचा: नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची ८ वर्षे आणि ५० निर्णय! )

मागच्या दोन दिवसांपासून येताहेत धमकीचे फोन

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बेडनारचे आमदार रवी राणा यांनी गेल्या महिन्यापासून हनुमान चालिसा पठणाचा मुद्दा लावून धरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. 14 मे रोजी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. सुटकेनंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालिसेचा विषय लावून धरल्याने त्यांना मागच्या 2 दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.