अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील तपासाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडी म्हणजेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रवी राणांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.
(हेही वाचा – शिर्डीतील साईबाबा मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश)
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता हे संपूर्ण प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणातील रवी राणा हे आरोपी असल्याचेही सांगितले जात होते. दरम्यान या प्रकरणात सहभागी असणाऱ्या रवी राणांचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
तर आमरावतीच्या विद्यमान पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या विरोधात सीआयडीकडे पुरावे देणार असल्याचे रवी राणांनी म्हटले होते. यावर रवी राणा म्हणाले, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. ज्या लोकांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी फोन केलेत आणि कोणाच्या दबावाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. यावेळी जो संवाद झाला याचे रेकॉर्डींगही माझ्याकडे आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सर्व पुरावे मी सीआयडीकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह आमरावतीमध्ये वसुली पथक नेमून कशापद्धतीने उद्धव ठाकरेंना पैसे पुरवले जात होते याचा पर्दाफाश नक्की करणार असे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community