पंजाबमध्ये काॅंग्रेस सत्तेच्या लायक नाही, कॅप्टन अमरिंदर सिंग भडकले

62

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार होता, हे ठिकाण पाकिस्तान सीमेपासून केवळ 10 किमी अंतरावर आहे. त्यामुळे सरकार जर पंतप्रधानांचे संरक्षण करू शकत नसेल तर ते सरकार सत्तेच्या लायकीचे नाही, अशा शब्दांत पंजाबच्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेस सरकारवर तोफ डागली आहे. अमरिंदर म्हणाले की, चरणजित सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

हे आहे प्रकरण

पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत ‘गंभीर त्रुटी’ झाल्याची घटना बुधवारी घडली. काही आंदोलकांनी मोदींचा रस्ता अडवला. जवळजवळ 20 मिनिटे पंतप्रधान अडकले होते. त्यानंतर त्यांची फिरोजपूरमधील प्रस्तावित सभा आणि विकास योजनांच्या पायाभरणीशी संबंधित कार्यक्रम रद्द करावे लागले. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रपती राजवट लावा

अमरिंदर सिंग यांच्या ट्विटवर लेफ्टनंट जनरल ए.के. चौधरी यांनी मी तुमच्या मताशी सहमत आहे, तसेच पंजाबचे सरकार बरखास्त करुन, राष्ट्रपती राजवट लावावी. पाकिस्तानच्या आयएसआय यांच्याशी हातमिळवणी करुन चालणारं सरकार एका संवेदनशील सीमा असणा-या राज्यात ठेवणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांची पत्नी आरटीओच्या रांगेत? वाचा…’त्या’ व्हायरल पोस्टमागील सत्य)

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काँग्रेस पंजाबमध्ये 84 दंगलीसारखी परिस्थिती निर्माण करत आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यासोबत झालेल्या या घटनेनंतर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.