पक्षप्रमुखांनंतर अखेर Ambadas Danve यांनीही व्यक्त केली दिलगिरी; सभापतींना दिले पत्र

89
पक्षप्रमुखांनंतर अखेर Ambadas Danve यांनीही व्यक्त केली दिलगिरी; सभापतींना दिले पत्र
पक्षप्रमुखांनंतर अखेर Ambadas Danve यांनीही व्यक्त केली दिलगिरी; सभापतींना दिले पत्र

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणांनी गाजत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी झाली. या वेळी शिवराळ भाषेत बोलणारे अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. (Ambadas Danve)

(हेही वाचा – Bhushi Dam : अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार; अजित पवारांचे निर्देश)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींना दिलेल्या पत्रात म्हटले की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याता आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि.१ जुलै २०२४ रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही.

सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिनींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती.

काय आहे प्रकरण ?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. त्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. (Ambadas Danve)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.