राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी १०० कोटींचा निधी देण्याची डील सुरु असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ट्वीटद्वारे केला आहे. शिवसेनेसोबत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. तशीच बंडखोरी राष्ट्रवादी पक्षात झाली असून अजित पवारांसोबत ३० पेक्षा जास्त आमदार गेल्याची चर्चा आहे. अशातच दानवेंनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच..
पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?#MaharashtraPoliticsCrisis
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2023
(हेही वाचा – अर्थ, सार्वजनिक बांधकामसह महत्त्वाच्या खात्यांसाठी राष्ट्रवादी आग्रही; शिवसेनेतून नाराजीचे सूर)
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना दानवेंनी ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू आहे. तर पन्नास यंदा आणि पन्नास पुढील वर्षी देण्याचा आश्वासन दिले जात आहे. तर अशा डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली आहे. शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?, असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community