उबाठा शिवसेना गटाकडून भाजपवर वारंवार तोंडसूख घेतले जात असतानाच तसेच पक्षप्रमुखांनी भाजपचा उल्लेख विघ्नसंतोषी असल्याचा आरोप केलेला असतानाच या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या दालनात जाऊन लोढा यांची भेट घेतली. विशेष म्हणजे तत्पूर्वी दानवे यांनी महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना महापालिका मुख्यालयातील पालकमंत्र्यांचे कार्यालय हे भाजपचा अड्डा बनल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर त्याच पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांसमवेत चहापानही केले. त्यामुळे ज्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला भाजपचा अड्डा बनवला त्याच अड्ड्यावर जाऊन चहापाणी केल्याने दराडेंना त्या अड्ड्यावर चहापाणी कशी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Ambadas Danve)
बेस्ट उपक्रमातील ७२५ पैकी १२३ नैमित्तिक कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी यावेळी शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी, बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष उमेश सारंग, माजी नगरसेवक तुकाराम पाटील, सचिन पडवळ आदी उपस्थित होते. (Ambadas Danve)
यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना दानवे यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बेस्टच्या नैमित्तिक कामगारांना कायम करण्यासंदर्भात आयुक्तांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले होते यावेळी शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, सुहास सामंत-अध्यक्ष बेस्ट कामगार सेना, अनिल पाटणकर-माजी अध्यक्ष बेस्ट, रंजन चौधरी-सरचिटणीस बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष उमेश सारंग मनोहर जुन्नर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते. त्यानुसार ही बैठक होती आणि या बैठकीत बेस्ट उपक्रमातील ७२५ पैकी १२३ नैमित्तिक कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत ऑर्डर काढून त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात येईल, तर उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापक यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. (Ambadas Danve)
या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यालयातील उपनगर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची रेलचेल असते. हे कार्यालय म्हणजे भाजपचा अड्डा बनला आहे, असा आरोप केला होता. परंतु त्यानंतर दानवेंनी इतर सहकाऱ्यांसमवेत उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत चहापाणीही घेतले. त्यामुळे ज्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयात भाजपचा अड्डा म्हटला त्याचठिकाणी जाऊन दानवेंनी चहापाणी घेतल्याने माध्यमांसमोर एक आरोप करायचा आणि दुसरीकडे त्यांची भेट घेऊन त्यांची चहापाणी घ्यायची हा प्रकार सर्वांनाच बुचकाळ्यात पाडणारा आहे. (Ambadas Danve)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community