आमदार झाल्यावर मला (Ambadas Danve) जिल्हाप्रमुखपदावरून पायउतार करण्यासाठी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पक्षप्रमुखांकडे अनेकदा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शुक्रवारी (१९ एप्रिल) वैजापूर येथे बोलताना केला. विशेषतः व्यासपीठावर खैरे उपस्थित असतानाच त्यांनी हे गुपित उघड केले. त्याचबरोबर पुढील निवडणुकीत मीच उमेदवार असेन, असेही त्यांनी जाहीर केले. वैजापूरमध्ये लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी सभापती अविनाश गलांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Ambadas Danve)
खैरे व दानवे यांच्यात वाद
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून खैरे व दानवे (Ambadas Danve) यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यांच्यातील वाद ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचला होता. प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनालाही दानवे गैरहजर होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला होता. (Ambadas Danve)
मी हटणाऱ्यांपैकी नाही
विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही खैरे यांनी मला जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकदा मागणी केली. मात्र आपण हटणाऱ्यांपैकी नसून कुणी कितीही प्रयत्न केले तरीही मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी त्या पदावरून दूर होईन, असे अंबादास दानवे म्हणाले. (Ambadas Danve)
हे पहा –
Join Our WhatsApp Community