Ambadas Danve : हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करून दाखवाच; अंबादास दानवेंचे आव्हान

161
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर जी कारवाई केली तीच कारवाई आता उद्धव ठाकरे यांच्यावर करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करत नालायक मुख्यमंत्री राज्याला लाभले असे टीका केली होती. त्यावरुन शंभुराज देसाई यांनी या विधानाची तपासणी व कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावर आव्हान दिले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवे  (Ambadas Danve) यांनी थेट आव्हानाची भाषा करत ‘हिंमत असेल तर त्यांनी ठाकरेंवर कारवाई करुन दाखवावी’, असे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार? अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नालायक असे संबोधित केले, ज्यामुळे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा अवमानकारक उल्लेख केला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.