अमेरिकेच्या ‘त्या’ विमानाने अफगाण नागरिकांना चिरडले!

अमेरिकेच्या त्या सी-१२ विमानाची चाके जेव्हा आत आली, त्यावेळी मात्र लँडिंग गियर येथे बसलेले नागरिक अक्षरशः चिरडले. त्यांच्या शरीराचे अवशेष चाकांना चिकटलेले आढळून आले.  

86

अवघ्या जगाला मंगळवारी, १७ ऑगस्ट हा दिवस थरकाप उडवणारा ठरला. त्या दिवशी तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवून पुन्हा एकदा खुलेआम दहशतवाद सुरु केला. त्यामुळे अफगाण नागरिक घाबरून देश सोडून जाण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी करू लागले. कोणतीही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात नसल्याने विमानतळावर जमलेली तुफान गर्दी अनियंत्रित होती, त्याचवेळी अमेरिकेचे विमान अफगाण नागरिकांना घेऊन जायला निघाले, त्यावेळी मात्र धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विमानाच्या चाकांमध्ये बरेच अफगाण नागरिक चिरडून ठार झाल्याचे आढळून आले आहे.

विमानाच्या चाकांना चिकटले मानवी अवशेष! 

अमेरिकेचे सी-१७ सैन्यदलाचे मालवाहू विमान जेव्हा मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शरणार्थी अफगाण नागरिकांना घेऊन निघत होते, तेव्हा मात्र विमानाचे दरवाजे बंद केल्यावरही मोठ्या संख्येने अफगाण नागरिक विमानाच्या मागे धावू लागल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर काही नागरिक विमानाच्या पंखावर आणि पंखाखाली बसलेले आढळून आले. हे विमान जेव्हा उडाले त्यावेळी मात्र काही नागरिक खाली पडले. तोही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. मात्र काही नागरिक विमानाची चाके जेव्हा आत आली, त्यावेळी मात्र लँडिंग गियरमध्ये येथे बसलेले होते, त्यामध्ये ते नागरिक अक्षरशः चिरडले. त्यांच्या शरीराचे अवशेष चाकांना चिकटलेले आढळून आले.

(हेही वाचा : स्वरा भास्करला अटक करा! का सुरु झाला ट्विटर ट्रेंड?)

धक्कादायक प्रकार पाहून वैमानिकाने व्हिडिओ चित्रित केला! 

ज्यावेळी विमानाने उड्डाण केले, त्यावेळी विमानाची चाके पायलटने आतमध्ये घेतली तेव्हा मात्र अडथळा येत होता. लँडिंग गियरमध्ये समस्या येऊ लागली. त्यामुळे एका वैमानिकाने काय अडथळा आला आहे, हे पाहण्यासाठी विमानातील विशिष्ट भाग उघडून पहिला तेव्हा धक्कादायक प्रकार दिसला. त्याठिकाणी काही अफगाण नागरिक विमानाच्या चाकांमध्ये चिरडलेले होते. त्या चाकांना मानवी अवशेष चिकटले होते. वैमानिकाने व्हिडीओ चित्रित केला. अफगाणिस्तानात अमेरिकेने नियुक्त केलेले जनरल केनेथ एफ. मॅकेंझी म्हणाले कि अफगाणिस्तानातील वादंग माजल्यावर अमेरिकेने तेथील शरणार्थी अफगाण नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानुसार अमेरिकेने ३ हजार २०० नागरिकांना आणले आहे, अशी माहिती दिली. या प्रकरणाची अमेरीका चौकशी करणार आहे.

(हेही वाचा : हुश्श! तालिबान्यांशी लढायला कुणीतरी आला…कोण आहे ‘तो’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.