भारताच्या १९ कंपन्यांसह रशिया, चीन, मलेशिया, थायलंड, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आदी एक डझनांहून अधिक देशांतील ३९८ कंपन्यांवर America ने निर्बंध लावले आहेत. या कंपन्या फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून रशियाला उपकरणे उपलब्ध करून देत असल्याचा व रशिया त्यांचा वापर युक्रेनविरुद्ध युद्धात करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. यापैकी बहुतांश कंपन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुरवठादार आहेत. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना रसद पुरवली जाते; शरद पवारांच्या आरोपावर Devendra Fadnavis काय म्हणाले?)
भारत सरकारची प्रतिक्रिया काय?
शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. अमेरिकेने (America) भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. मात्र, भारताकडे व्यापार धोरण-व्यापार नियंत्रणासंदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आम्ही त्याचे पालन करतो. याशिवाय भारत वासेनार व्यवस्था, ऑस्ट्रेलिया समूह आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचाही सदस्य आहे. तसेच आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचेही पालन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमच्या माहितीनुसार ज्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यापैकी कोणतीही कंपनी भारतात कायद्याचे उल्लंघन करत नाही. मात्र, तरीही अमेरिकेच्या आरोपानंतर आम्ही संबंधित विभागाच्या संपर्कात आहोत. तसेच आम्ही अमेरिकेतील अधिकाऱ्यांशीही यासंदर्भात चर्चा करतो आहे. (America)
Join Our WhatsApp Community