अमेरिकेचे America राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पाकिस्तानला धक्कातंत्र वापरले आहे. एका अट्टल दहशतवाद्याला पकडून देण्यात पाकिस्तान सरकारने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण नुकतेच अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना देशात प्रवेशच नाकारल्यामुळे या मुद्द्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा पाहायला मिळत आहे. के.के. एहसान वॅगन असे या उच्चाधिकाऱ्यांचे नाव असून त्यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तानमधील उच्चाधिकारी वॅगन सोमवारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर उतरले. विमातनतळावर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पाकिस्तानातून अमेरिकेत America प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र त्यांच्याकडे होती. वॅगन हे अमेरिकेत सुट्ट्यांसाठी जात असताना त्यांना लॉस एंजेलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हटकले आणि कागदपत्रांवर आक्षेप घेतला.
(हेही वाचा holi special food: भारतभर होळीनिमित्त प्रसिद्ध असणाऱ्या विशेष खाद्यपदार्थाबाबत ‘ही’ माहिती अवश्य वाचा )
कारवाईचे कारण काय?
वॅगन यांना कागपपत्रांमधील आक्षेपार्ह मुद्द्यांवर आक्षेप घेत अमेरिकेत America प्रवेश नाकारला. त्यांच्या कागदपत्रांमध्ये असणारा मजकूर नियमांना धरून नसल्याचे नमूद करत अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वॅगन यांना त्यांच्या आधीच्या ठिकाणी परतण्यास सांगितले. त्यामुळे अमेरिकेतील America व्हिसाविषयक नियम, उच्चाधिकाऱ्यांसंदर्भातले प्रोटोकॉल्स आणि या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई, यावर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेकडून मात्र या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community