सध्या कॅनडा आणि भारत (Canada vs India) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडाने या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हा आरोप केल्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील मतभेद वाढत आहे. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने हा आरोप गंभीर असल्याचे सांगत या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी भारतावर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले, ‘अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचे मी ठामपणे नाकारतो. आम्ही (कॅनडाच्या) आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत, तपास पुढे जावा आणि गुन्हेगारांना जबाबदार धरले जावे अशी आमची इच्छा आहे. हा मुद्दा जगजाहीर झाल्यापासून अमेरिका खंबीरपणे उभी आहे आणि तो पूर्णपणे बाहेर येईपर्यंत ठामपणे उभा राहील. कॅनडात शीख ‘अलिप्ततावादी नेत्या’च्या हत्येबद्दल कॅनडाच्या दाव्यानंतर अमेरिका उच्च पातळीवर भारतीयांच्या संपर्कात आहे आणि सरकार याप्रकरणी भारताला कोणतीही “विशेष सवलत” देत नाही, असे जेक सुलिव्हन म्हणाले.
(हेही वाचा IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलिया फलंदाज दबावात)
Join Our WhatsApp Community