भारताने नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) मध्ये सहावा सदस्य म्हणून सामील व्हावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे, असे अमेरिकेचे खासदार रो. खन्ना यांनी म्हटले आहे. असे झाल्यास भारताचे पारडे अमेरिकेच्या बाजूने झुकू शकते. कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट असलेले खन्ना म्हणाले की, नाटोचे सदस्य असलेल्या देशांना संरक्षण करारांना त्वरित मंजुरी मिळते. अमेरिकेने ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेसोबत असे करार केले आहेत.
तर भारताचे पारडे अमेरिकेकडे झुकेल!
खन्ना म्हणाले, नाटो प्लसचा सहावा सदस्य म्हणून भारतामध्ये सामील होण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी मजबूत होईल. मी हे प्रयत्न दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते आणि यापुढेही करत राहीन. यासंबंधीचे विधेयक सिनेटमध्येही मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने 14 जुलै रोजी नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ऍक्ट (NDAA) मध्ये सुधारणा करण्याचा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर केला. या ठरावात भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत करण्याचा प्रस्ताव आहे. खन्ना यांनी स्वतः संसदेत प्रस्ताव मांडला आहे. काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट (KATSA) मधून भारताला दिलासा देणे हे अमेरिकेच्या हिताचे आहे आणि यामुळे दोन्ही देशांची संरक्षण भागीदारी अधिक दृढ होईल, असे अमेरिकन खासदार म्हणाले. रशियासोबत मोठे संरक्षण करार असलेल्या देशांवर अमेरिका CATSA अंतर्गत निर्बंध लादते. भारतीय वंशाचे खासदार म्हणाले, ‘अमेरिकेला भारतासोबत मजबूत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी हवी आहे. दोन्ही लोकशाही देश आहेत. चीन आणि रशियाच्या उदयामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी खूप महत्त्वाची बनते. मात्र सध्या NATO हा भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाचा एक नंबरचा शत्रू आहे, अशा वेळी NATO चे सदस्य घेणे म्हणजे रशियाशी वैर घेण्यासारखे आहे, त्यामुळे भारत हा विचार करून अमेरिकेच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद देतो, हे येणाऱ्या काळात दिसेल.
(हेही वाचा अमित शहांनी एकनाथ शिंदेंना सांगितली ‘मातोश्री’तील बंद दारामागील चर्चा!)
Join Our WhatsApp Community